विरुद्ध आहाराचे प्रकार

समशन : पथ्यकर व अपथ्यकर पदार्थ एकाचवेळी खाणे यालाच समशन म्हणतात.

अध्यशन : भोजन केल्यानंतर पुनः ते पचलेले नसतांना वरचेवर भोजन करणे म्हणजे अध्यशन.

विषमाशन : भोजन करण्यास जो काळ योग्य काळ आहे त्या आधीच किंवा भोजनाची वेळ टळून गेल्यानंतर भोजन करणे म्हणजे विषमाशन होय.

विरुद्धाशन ( विरुद्ध आहार) : सध्या हा प्रकार सर्रास आढळतो.

दोन खाण्याचे पदार्थ वेगवेगळे खाल्ल्यास त्यापासून अपाय होत नाही. त्याच दोन खाद्यपदार्थांचे मिश्रण केले असता मात्र ब-याच वेळी तात्काळ विषासारखे परिणाम दिसून येतात किंवा कधी कधी काही काळाने दिसून येतात. या दोअन किंवा अधिक पदार्थांच्या एकत्रित अशा आहार कल्पनेला ‘विरुद्ध आहार’ असे म्हणतात. विरुद्ध आहाराच्या परिणमस्वरूप मृत्युसारखे भायानक संकटदेखील ओढवू शकते.

असे होण्याचे कारण दोन्ही पदार्थांचे गुण, त्यावर होणा-या उष्णता देणे, तळणे, भाजणे, वाफवणे इ. क्रिया / संस्कार हे होय. या सर्वांअही माहिती करून घेणे आवश्य्क आहे. आपल्या रोजच्या आहारात किंवा दैनंदिन नव्हे मात्र प्रासंगिक जरी असे आहार पदार्थ येत असतील तरी ते टाळणे व आतापर्यंत खात असल्याचे वैद्यास सांगणे ब-याच वेळी चिकित्सा सोपी करते. विरुद्ध आहार घटक व त्यांच्यामुळे होणारे आजार माहीत असणे आवश्यक असल्याने ते खाली दिलेले आहेत. प्रत्येकाने यावर गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे. या सर्व विरुद्ध असणा-या आहार घटकांचे परस्पर एकत्रिकरणाने उद्भवणारे आजार इ. विषयी आतुर्वेदिक ग्रंथात माहिती आहे व त्याचा यथासांग ऊहापोहदेखील केलेला आहे.

  • ** कोंबडा, तित्तिर, बोकड इ. तसेच पाण्यात राहणा-या प्राण्यांचे मांस क्धीही मध, गुळ, तीळ, दुध, उडीद, मुळी, कमलनाल आणि मोड आलेले धान्य यांच्यासोबत खाऊ नये.
  • ** दुध व मासे एकत्र खाऊ नये.
  • ** आंबट चव असलेले सर्व पदार्थ, सर्व फळे ही दुधासोबत एकत्र करून खाऊ नये. ते सर्व दुध घेण्याच्या अगोदर किंवा नंतर्सुद्धा घेऊ नयेत. अन्यथा त्वचाविकार होऊ शकतात. ( फ्रूट सँलड, शिकरण ज्यांना आवडते त्यांनी या गोष्टींवर गंभीर विचार करावा.)
  • ** कच्चा मुळा न शिजविता दुधासह किंवा दुध घेण्याच्या अगोदर वा नंतर खाऊ नये.
  • ** हिंग असलेल्या पदार्थांसह मध व दुध खाऊ नये.
  • ** राईच्या (मोहरीच्या) तेलात परतलेले मांस हे मध व दुध यांच्यासोबत खाऊ नये.
  • ** हरीण व कोंबडा यांचे मांस दह्यासोबत खाऊ नये.
  • ** कांजीसह तिळाची केलेली पुरीसुद्धा विरुद्ध्च आहे.
  • ** दुधासोबत मीठ खाऊ नये.
  • ** मुळा व उडीदाचे वरण एकत्र खाऊ नये.
  • ** लोण्यासोबत मुळा किंवा इतर कोण्तीही भाजी खाऊ नये.
  • ** दही, उअदाचे कढण, गुळ, मध, तूप यांपैकी कशाही सोबत उंबराचे फळ, लोणचे खाऊ नये.
  • ** काश्याच्या भांड्यात ठेवलेले दही किंवा अधिक दिवसांचे तूप खाऊ नये.
  • ** मध, दही, भिलावा ( बिब्बा ) या कुणाही सोबत उष्ण पदार्थ खाऊ नये.
  • ** मध, खिचडी व दुध एकत्र खाऊ नये.
  • ** समान प्रमाणात मध आणि तूप ( सम वजनाच्या प्रमाणात अपेक्षित) एकत्र खाऊ नये. तसेच ते खाऊन त्यावर पावसाचे पाणी पिऊ नये. याबरोबरच कमी अधिक प्रमाणात मध आणि तूप घेतलेले असेल तरी त्यावर पावसाचे पाणी पिऊ नये.
  • ** दुधात शिजवलेला भात (दुध, पाक, दुधाची खीर) व सार तसेच कांजी यंसह एकत्र खाऊ नये. असे खाल्ल्याने कफ वाढतो.
  • ** मासे तळलेल्या तेलात व भांड्यात पिंपळ शिजविणे विरुद्ध आहे.
  • ** थंड व गरम, जुने व नवीन, कच्चे व पिकलेले असे पदार्थसुद्धा एकत्र खाऊ नये. ( चहा घेण्याआधी पाणी पिणे ?)
  • ** कडक ऊन किंवा आगीजवळ बसून शरीर तापल्यावर एकदम गार पाण्यात जाऊन स्नान करू नये. अन्यथा त्वचा व नेत्र यांना इजा होते व तृष्णा ( तहान ) वाढते.
  • ** ऊन्हाने किंवा अग्निने शरीर तापलेले असतांना थंड पाणी किंवा दुध प्यायल्यास ‘रक्तपित्त’ नावाचा आजार होतो.
  • ** थकवा आलेला असतांना लगेच जेवण करू नये. बोलण्याचे श्रम केल्यानंतर्सुद्धा लगेच बोलु नये. असे केल्याने उलटी होते किंवा स्वरभेद ( आवाज बसणे ) होतो.

विरुद्ध आहाराने होणारे आजार :

अंगावर फोड येणे, सूज येणे, गळू, गुंगी येणे, क्षय, ताप, रक्तपित्त, वाताचे आजार, मुतखडा, त्वचा रोग, मधुमेह, जलोदर, भगंदर, अर्श ( मूळव्याध ), ग्रहणी तसेच लगेच मृत्युही येऊ शकतो. अशा विरुद्ध आहाराने शरीराचे तेज, बळ, स्मरणशक्ती, बुद्धी, मन आणि चित्त यांचाही नाश होतो.

भोजन वाढण्याची व खाण्याची पद्धत :

दातांनी चावून, तोडून खाण्याचे पदार्थ, भाज्या लाडू वगैरे पदार्थ ताटात आपल्या उजव्या हातास येतील असे वाढावे. पिण्याचे पदार्थ, पाणी इत्यादी व चवीचे चटण्या, कोशिंबीर, पिंडी वगैरे पदार्थ ताटात आपल्या डाव्या बाजूस वाढावे. भात वैगरे पदार्थ आपल्यासमोर ताटाच्या मधोमध वाढावेत.

सर्वप्रथम द्रवपदार्थ, गोड व पचनास जड पदार्थ खावेत. त्यानंतर मधोमध आंबट व खारट पदार्थ खावेत व शेवटी रुक्ष (कोरडे पदार्थ खावेत. ( स्वीट डीश / आईस्क्रिम जेवणाच्या शेवटी कसे काय दिले जातात बुवा ? )

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.