आमच्याविषयी - सविस्तर

मी वैद्य. मनीष मनोहर जोशी.

आयुर्वेद व्यवसाय करणारा डॉक्टर म्हणजे वैद्य आणि म्हणुन मी माझ्या नावाच्या पुढे ‘डॉ.’ असे न लावता ‘वैद्य.’ असे लावतो.

मी २००० साली बी.ए.एम.एस. (BAMS) ही पदवी प्राप्त केलेली आहे आणि त्यासोबतच पुणे येथुन डी.वाय.ए. (DYA – Diploma in Yog & Ayurved) हा कोर्स पूर्ण केलेला आहे.

दर्शन आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केन्द्राच्या माध्यमातून गेल्या 24 वर्षांपासून नाशिक येथे शुद्ध आयुर्वेद चिकित्सक आणि पंचकर्म तज्ञ म्हणून कार्य करीत आहे.

क.व्यं.ता.र. आयुर्वेद महाविद्यालय, बोराडी, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे येथुन बी.ए.एम.एस. ची पदवी प्राप्त केल्यानंतर आयुर्वेदाच्या ग्रंथात जसे वर्णन केलेले आहे त्या पद्धतीने गुरु – शिष्य परंपरेने धुळे येथील वैद्य. प्रवीण जोशी आणि पुणे येथील वैद्य दिलीप गाडगीळ व वैद्य. समीर जमदग्नी यांच्याकडून आयुर्वेदाचे आणि पंचकर्मांचे प्रात्यक्षिक ज्ञान घेऊन नंतर आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सक म्हणून व्यवसाय नाशिक नगरीत सुरू केला.

आपल्या या भारतभूमीत ज्या आयुर्वेदाचे बीज रोवलेले आहे त्या आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने आजपर्यंत माझे सुमारे ४५० लेख विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रकाशित झालेले आहेत. तसेच “आपले सण व आयुर्वेद” आणि “आरोग्यम” ही दोन पुस्तकेही मी लिहिलेली आहेत. नाशिक नगरीच्या परिसरात असलेल्या ग्रामीण भागात आयुर्वेदाचे महत्व सांगणारी सुमारे २५ व्याख्याने आयोजित झालेली आहेत. तसेच मेरी (M.E.R.I. – Maharashtra Engineering Research Institute) येथे वेळोवेळी शासकिय सेवेतील अभियंत्यांसाठी संपन्न होणा-या परिसंवादात आदर्श दिनचर्या आणि आरोग्यविषयक मनःजागृती करणारी आजपर्यंत सुमारे 80 व्याख्याने संपन्न झालेली आहेत. मे २००७ मध्ये मला “ पंचकर्म –अश्विनौ ” हा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच माझ्या आयुर्वेदावरील निबंधाला राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार लाभलेला आहे.

सध्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत असलेले संगणक आणि अंतरजाल (इंटरनेट) या माध्यमातून आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा दृष्टीकोन समोर ठेवून हे संकेतस्थळ बनविण्या्ची कल्पना मनात आली.

आयुर्वेद चिकित्सक म्हणून काम करतांनाच मला संगणक आणि अंतरजाल (इंटरनेट) याविषयी कायमच आकर्षण वाटत आलेले आहे. कोणताही क्लास न करता किंवा संगणकविषयक पदवी न घेता मी हे संकेतस्थळ बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो कितपत यशस्वी झालेला आहे हे मला माहित नाही. पण या संकेतस्थळाविषयी आपले मत, आपल्या सूचना यांचे मी स्वागत करतो आहे.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.