• अंगमर्द : अंग ठेचल्यासारखी पीडा
 • अजीर्णाशन : न पचणारा आहार
 • अतिसार : जुलाब
 • अतिस्निग्ध : ज्याचे स्नेहन हे पूर्वकर्म अति झालेले आहे असा
 • अधिष्ठान : आश्रयस्थान
 • अनुलोम : स्वाभाविक दिशेने अनुसरून असणारा
 • अनुलोमन : वात - पित्त - कफ आदि दोषांना स्वतःच्या मार्गाकडे वळविणे / तसे वळविणारे औषध
 • अनुवासन बस्ती : तेलाच्या सहाय्याने गुदमार्गातून दिलेले औषध
 • अन्त्र : आतडे
 • अभिघात : मार लागणे, धक्का लगणे
 • अभ्यंग : अंगाला तेल / तूप यासारखे स्निग्ध पदार्थ चोळणे
 • अभ्यंतर : आतील बाजुचा
 • अम्ल : आंबट
 • अम्लविपाकी : पचन झाल्यावर जे आंबटपणा निर्माण करते ते
 • अयोग : लागू न होणे
 • अर्दित : तोंड / तोंडाचा काही भाग ज्यात वाकडे होते असा आजार (फेशियल पँरँलिसिस)
 • अर्श : मूळव्याध
 • अवम्य : वमन देण्यास अयोग्य व्यक्ती
 • अवलेह : चाटून खाण्याजोगे औषध
 • अवष्टंभ : अवरोध
 • अविदाहि : जळजळ, दाह न करणारे
 • अव्यक्तरस : ज्याची चव नक्की सांगत येत नाही ते
 • असात्म्य : ज्याची सवय नाही असे
 • आटोप : पोटात गुडगुड आवाज येणे
 • आतपसेवन : ऊन्हात बसणे
 • आध्मान : पोट फुगणे
 • आम : १ आव २ अपक्व व दुषित अन्नरस ३ दुषित दोषांच्या एकत्रीकरणातून उत्पन्न एक घटक
 • आमाशय : अन्न प्रथम ज्या पोकळीत जाते तो भाग
 • आशय : रक्त आदी घटकद्रव्यांचे कोश
 • आशुकारी : शीघ्र गतीचा रोग / औषध
 • आसव : मद्य
 • आस्थापन बस्ती : मळ बाहेर काढणारी गुदद्वारातून दिली जाणारी काढ्याची बस्ती
 • आस्यपाक : तोंड येणे, मुखपाक
 • उत्कारिका : भाकरी, पोळी
 • उत्क्लेश : मळमळ, उलटी होईल असे वाटणे, स्वतःच्या स्थानातून घटक पदार्थ बाहेर पडेल इतपत वाढणे
 • उव्दर्तन : उटणे, एखादा पदार्थ कोरडा किंवा चटणीसारखा बनवून अंगाला चोळणे
 • उपशय : रोग कमी होणे
 • ऊर्ध्वजत्रूगत : छातीच्या वरच्या भागात होणारे
 • उर्ध्ववात : दमा, उचकी या रूपात वात वर्च्या दिशेने होणे
 • ओज : शरीरातील सर्व धातूंचे साररूपी पदार्थ / सत्व

 • कटु : तिखट
 • कर्णनाद : कानात आवाज होणे
 • कर्णपूरण : कानात औषधी तेल इ. घालणे
 • कर्शन / कर्षण : कृश करण्याची प्रक्रिया / लंघन
 • कलल : फार घट्ट नाही असे गर्भाचे सुरूवातीचे स्वरूप
 • कला : शरीरातील पातळ त्वचा
 • कल्क : औषधी वाटून केलेला चटणीसारखा पदार्थ
 • कल्प : औषधाचे स्वरूप उदा.चूर्ण, काढा इ.
 • कवल : गुळणी जी तोंडातल्या तोंडात फिरविता येते
 • कषाय : १) तुरट रस २) काढा
 • कामला : कावीळ
 • कास : खोकला
 • किटीभ : एक त्वचाविकार (सोरायसिस ?)
 • किट्ट : मळ
 • किलास : पांढरे कोड
 • क्लान्ति : ग्लानि
 • क्लेद : जलांश / द्र्वांश
 • क्लेदन : पातळ करणे
 • क्षारसूत्र : औषधी क्षार विशिष्ट पद्धतीनी लावलेला दोरा
 • गण्डूष : गुळणी जी तोंडातल्या तोंडात फिरविता येत नाही एवढ्या मात्रेत असते
 • गरपिडीत : कृत्रिमविषाची बाधा झालेली व्यक्ती
 • गलग्रह : घसा धरणे
 • गाढ : घट्ट
 • गात्रभेद : अंग मोडून येणे
 • गात्रसाद : अंग / हातपाय गळल्यासारखे होणे
 • गुरू : जड ( पचायला / गुणाने)
 • गुल्फ : घोटा
 • ग्रह : १) जखडणे २) ग्रहबाधा
 • ग्राहक : स्तंभ - मलबद्धता करणारा
 • ग्राही : स्तंभ करणारा

 • चिकित्सा : उपचार, औषधीयोजना
 • चिरकारी : फार दिवसांपासून असलेले
 • जंगम : प्राणिजन्य
 • जत्रु : छातीचे मधले हाडाच्या वरचा भाग ( जिथे गळा संपतो तिथे लागणारे खोलगट हाड)
 • जांगल : यात झाडे व पाणी कमी आहेत असा प्रदेश
 • जीवनीय : जीवनव्यापाराला आवश्यक

 • डिंब : मलाशयाचा खालचा भाग
 • तंद्रा : झांपड
 • तर्जनी : अंगठ्याजवळचे बोट
 • तर्पण : १) पुष्टीकरण २) डोळ्यावर उडीदाच्या पीठाचे पाळं तयार करून पातळ तूप वगैरे धारण करणे
 • तिक्त : कडू
 • तिर्यक् : तिरकस, वाकडा, वर / खाली नसलेला
 • त्रिक : माकडहाड
 • दद्रू : गजकर्ण / नायटा हा आजार
 • दारण : औषधी क्षार लावून फोड / गळू फोडण्याची क्रिया
 • दीपक / दीपनीय : भूक वाढविणारे औषध
 • दीपन : भूक वाढविण्याची क्रिया
 • दुष्टव्रण : दुषित झालेली जखम
 • दुष्य : वात पित्त आणि कफ या दोषांनी जे दुषित होतात ते ( धातू आणि मळ)
 • दोषल : वातादि दोषांचा प्रकोप करणारे
 • दौहॄद : डोहाळे
 • द्वंद्वज : दोन दोषांपासून झालेला (वातपित्त / पित्तकफ /वातकफ एकत्र होन झालेला)
 • नस्य : नाकावाटे द्यावयाचे औषध
 • नाडीस्वेद : नळीच्या सहाय्याने एखाद्या अवयवाला वाफारा देणे
 • निदान : १) रोगाचे कारण २) रोगाचा हेतु आणि लक्षणे ज्यात सांगितलेली आहेत असे वैद्यकाचे एक अंग
 • निज : शारिरीक कारणांनी उत्पन्न झालेला आजार
 • निराम : आम नसलेला, आमरहित, पक्व
 • निरुढ : ज्याला निरूह (काढ्याचा) बस्ती दिलेला आहे अशी व्यक्ती
 • निरुह बस्ती : मळ व दोष बाहेर काढण्यासाठी दिलेला काढ्याचा बस्ती (गुदावाटे पिचकारी)
 • परिपाक : पक्व होणे
 • परिषेक : पातळ औषध अंगावर शिंपडणे / त्याची धार धरणे
 • परिस्त्राव : बुळबुळित स्त्राव
 • पाक : १) पू होणे २) परिपाक / पक्व होणे
 • पाचन : १) पचविणे , पक्व करणे २) तसे करणारे औषध
 • पांचभौतिक : पंचभूतात्मक / पंचभूतांशी संबंधीत
 • पाटन : फोडणे / फाडणे
 • पादचतुष्टय : वैद्यकाचे चार पाय (वैद्य, औषध, सेवक , रोगी)
 • पानक : पन्हे
 • पानात्यय : अति मद्यपानाने होणारा एक आजार
 • पामा : आगपैण
 • पार्थिव : मातीपासून उत्पन्न
 • पिच्छिल : बुळबुळीत
 • पिटिका : पुळ्या
 • पिण्डस्वेद : औषधी पुरचुंडीने शेकणे
 • पित्तल : पित्तकारक
 • पुराण : जुने
 • प्रतिलोम : उलट दिशेने जाणारे (अनुलोमच्या विरुद्ध)
 • प्रतिसारण : कोरडे औषध चोळणे
 • प्रदर : स्त्रियांत होणारा धुपणीचा आजार, मासिक पाळीचा एक आजार : श्वेतप्रदर / रक्तप्रदर
 • प्रधमन : नळीने नाकात चुर्ण फुंकणे (नस्याचा एक प्रकार)
 • प्रमेह : मधुमेह आदी २० प्रकारचे मूत्रसंबंधी विकार
 • प्रवाहिका : कुंथुन शौचास होणे (डिसेन्ट्री)
 • प्रसेक : लालास्त्राव , तोंडास पाणी सुटणे एक आजार
 • प्रीणन : त्रुप्ती देणारे
 • प्लीहा : पांथरी (स्प्लीन)
 • फलवर्ती : जुलाब होण्यासाठी गुदात ठेवायचा वातीसारखा एक औषधाचा प्रकार
 • बल्य : बल देणारे
 • बस्ती : १) मूत्राशय २) प्राण्यांच्या मूत्राशयापासून बनविलेल्या पिशवीसारख्या साधनाने नळीच्या सहाय्याने गुदमार्गाद्वारे औषध आत सारण्याची क्रिया
 • बाधीर्य : बहिरेपणा
 • बृंहण : पुष्ट करणे, लठ्ठ करणे
 • भेदक : सारक, मळ पातळ करणारे
 • भेदन : सारक, मळ पातळ करण्याचा गुण असणारे
 • भेषज : औषध
 • मण्डल : अंगावर चकंदळ उठण्याचा आजार
 • मन्यास्तंभ : मान जखडणे
 • मस्तु : दह्याची निवळ
 • मात्रा : औषधाचे प्रमाण
 • मात्राबस्ती : तेलाचा विशिष्ठ मात्रेतील बस्तीचा प्रकार
 • मांसल : पुष्कळ मांस असणारे
 • मिथ्यायोग : वाईट / चुकिचा उपयोग
 • मुढगर्भ : अडलेला गर्भ
 • मूत्रल : लघवीचे प्रमाण वाढविणारा
 • मूर्धतैल : डोक्यावर तेल जिरविणे
 • मेदस्वी : ज्याच्या शरीरात जास्त मेद / चरबी आहे असा
 • मेधा : बुद्धी , धारणाशक्ती, विचारशक्ती
 • मेध्य : बुद्धी वाढविणारे
 • मोह : बेशुद्ध होणे
 • यकृत : काळीज (लिव्हर)
 • यवागु : तांदूळाच्या सहापट पाणी टाकून शिजवलेली पेज
 • याप्य : औषध चालू असेपर्य्न्त बरा असणारा आजार
 • युष : धान्याचे कढण
 • योग : अनेक औषधांचे मिश्रण ( उदा. सितोपलादि चुर्ण, त्रिफळा चुर्ण इ.)
 • योगवाहि : ज्या औषधाबरोबर दिले त्यानुसार काम करणारा व मुख्य औषधाचे कार्य वाढविणारा (कँटँलिस्ट)
 • रक्तार्श : रक्तीमूळव्याध
 • रज : स्त्रियांचा विटाळ, मासिक पाळीचा स्त्राव
 • रस : १) गोडखारट इ. सहा चवी २) आहारापासून तयार होणार पहिला धातू ३) पारा ४)मांसरस (मांसापासून बनविलेले सूप)
 • रिष्ट : मृत्युसुचक लक्षणे / चिन्ह
 • रुक्षण : शरीरातील अतिरिक्त स्निग्धता कमी करण्याची क्रिया
 • रोचक : चव देणारे
 • रोपण : जखम भरून आणणारे
 • लघु : हलके, पचायला सोपे
 • लंघन : उपवास
 • लालास्त्राव : जास्त लाळ गळणे
 • लीन : लपून राहिलेले / कोडलेले ( दोष / रोग इ.)
 • लेखन : खरडून काढण्याची क्रिया / तसे कार्य करणारे औषध
 • वमन : औषधांनी उलटीद्वारे कफ बाहेर काढणे , पंचकर्मातील एक कर्म
 • वर्ती : वात
 • वली : अंगावर सुरकुत्या पडणे
 • वातरक्त : सांधेदुखीचा एक प्रकार (गाऊट ?)
 • वातानुलोमन : वात दोषाला स्वस्थानी आणणारे औषध
 • वामक : वमन करणारे
 • वारुणी : एक मद्याचा प्रकार (ताडी ?)
 • विचर्चिका : एक त्वचारोग (इसब ?)
 • विदाह : पिकणे, शिजणे
 • विदाही : घशाशी जळजळ करणारे
 • बिपादिका : तळहात / तळपायाला भेगा पडणे
 • विबन्ध : अडथळा
 • विरेचन : औषधाद्वारे जुलाब करविणे , पंचकर्मातील एक कर्म
 • विलेपी : आटवल , पातळसर भात
 • विषमाग्नि : जो अग्नि कधी अन्न पचवितो तर कधी नाही.
 • विषुचिका : पटकी (कॉलरा)
 • वीर्य : १) द्रव्यांतील शीतता / उष्णता याला कारणीभूत तत्व २) शक्ती ३) रेत, शुक्र (सिमेन)
 • वृक्क : मूत्रपिण्ड , किडनी
 • वृष्य : कामोत्तेजना वाढविणारे
 • वेगावरोध : मलमूत्र इ.चे आलेल्या संवेदना रोखुन धरणे
 • व्यवायी : जे द्रव्य न पचता त्वरीत शरीरात पसरते आणि नंतर पचते ते (उदा. विष / मद्य)
 • शकृत् : मल, विष्ठा, शौचाचा मळ
 • शतधौत : शंभर वेळा धुतलेले (उदा. शतधौत घृत)
 • शम : उपशम, दोष कमी होणे
 • शमन : दोषांना समस्थितीत आणणारे
 • शर्करा : मूत्रावाटे बारीक रेतीसारखे खडे पडणे
 • शलाका : सळई (अग्निकर्म शलाका)
 • शल्य : सलणारा पदार्थ (फॉरेन बॉडी)
 • शाखा : शरीराचे हात व पाय हे चार भाग
 • शारीर : शरीररचनेचे शास्त्र (अँनॉटॉमी)
 • शिंबी धान्य : शेंगेत तयार होणारे धान्य
 • शिराव्यध : शीर (नस) कापून रक्त काढणे, पंचकर्मातील एक कर्म
 • शिरोबस्ती : डोक्यावर टोपीसारखे साधन ठेऊन त्यात औषध भरून ठेवणे, उपकर्मातील एक कर्म
 • शिरोविरेचन : नस्याचा प्रकार
 • शुक्रल : शुक्र वाढविणारे
 • शुष्कार्श : कोरडी मूळव्याध , केवळ मोड असणारी व ज्यातून रक्तस्त्राव होत नाही अशी मूळव्याध
 • शोथ / शोफ : सुज
 • शोधन : पंचकर्म, या कर्मांद्वारे दोष शरीराबाहेर काढुन टाकण्याची क्रिया
 • श्लेष्मा : कफ
 • श्वित्र : पांढरे कोड
 • संज्ञा : १) शुद्धी २) मान , परिमाण ३) ज्ञान ४) विशिष्ट अर्थ असणारा शब्द
 • संधि : सांधा
 • सन्निपात : तीन्ही दोषांचा एकत्र प्रकोप / क्षय
 • संन्यास : तीव्र मूर्च्छा (कोमा)
 • संप्राप्ती : दोषांपासून रोग निर्माण होण्याची प्रक्रिया
 • सम्यग् : योग्य प्रकारे, चांगल्या रितीने
 • संशोधन : शोधन शब्द पहा
 • संसर्ग : दोन दोषांचा संयोग
 • सहज : जन्मजात
 • सात्म्य : १) सवय असलेला २) पचनी पडलेला ३) औषधांनी रोग कमी होणे
 • साम : आमाने युक्त
 • स्तम्भ : जखडणे, ताठरपणा
 • स्निग्ध : ओशटपणा
 • स्नेह : तेल, तूप इ. स्निग्ध पदार्थ
 • स्नेहन : शरीराला स्निग्धता, ओशटपणा आणण्याची क्रिया
 • स्नेहपाक : औषधी घालून तेल किंवा तूप तयार करणे
 • स्नेहपान : तेल / तूप इ. स्नेह पिणे
 • स्त्रोतस : शरीरातील नळीसारखे पोकळ पदार्थ ज्यातून शरीरातील भावघटक वाहत असतात.
 • स्वरभंग : आवाज बसणे
 • स्वरस : ओले औषध वाटून, पिळून त्यातील बाजुला काढलेला द्रव भाग
 • स्वेदन : वाफारा
 • स्विन्न : ज्याला वाफारा देऊन घाम आलेला आहे असा
 • हनुग्रह : दातखिळी बसणे
 • हिध्मा : उचकी
 • हिम : थंड पाण्यात ठराविक वेळ औषध भिजवून, गाळून बाजुला काढलेले पाणी
 • हिनयोग : वमन इ. कर्म योग्य मात्रेपेक्षा कमी लागू होणे
 • हॄद्ग्रह : हॄदयात जखडल्यासारखे वाटणे
 • हॄद्य : मनाला प्रिय
 • हॄल्लास : मळमळ
दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.