शोधन किंवा पंचकर्म चिकित्सेमध्ये प्रामुख्याने बिघडलेले दोष शरीराबाहेर काढले जातात. शमन औषधी मात्र दोषांना शरीराबाहेरही काढत नाहीत किंवा सम असलेल्या दोषांनाही वाढवत नाहीत, तर विषम दोषांना साम्यावस्थेत आणतात. असे जे उपचार त्यांना ‘शमन औषधी’ / ‘शमन चिकित्सा’ असे म्हटले जाते.

शमन हे सात प्रकारचे आहे.

  • १) पाचन : न पचलेल्या , आमस्वरूप घटकांची पाचन करणारे औषध.
  • २) दीपन : मंद झालेल्या अग्निला पुन्हा प्रदिप्त करणारे औषध.
  • ३) क्षुधा : उपवास करणे, भुकेलेल्या अवस्थेत रुग्णाला ठेवून वाढलेल्या दोषांवर अग्निची पचनक्रिया होण्यासाठी वाव देणे.
  • ४) तृष्णा : पाणी पिण्याचा पूर्ण त्याग शक्य नसले तरी तहानलेली अवस्था लांबवून त्याचा उपयोग उपचार म्हणुन शक्य होतो.
  • ५) व्यायाम : व्यायाम करून दोषांमध्ये साम्य आणणे.
  • ६) आतप सेवन : आतप सेवन म्हणजे ऊन्हात बसून त्या उष्णतेच्या सहाय्याने दोष समस्थितीत आणणे
  • ७) मारूत सेवन : मारूत म्हणजे वारा. वा-यात बसून, हिंडून दोष समस्थितीत आणणे

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.