कोणतीही उपचारपद्धती असली अरी त्यामध्ये रोगाचे निदान करून नंतर उपचार करणे सगळ्यात महत्वाचे आहे.

आयुर्वेदाने केवळ रोगाचाच विचार करून एकांगी उपचार न ठरवता ज्या शरीरात रोग आहे त्या शरीराचा विचार करून रोगी परिक्षणास महत्व दिलेल आहे. म्हणूनच रोगाची चिकित्सा करण्यापेक्षा रोग्याची चिकित्सा हे आयुर्वेदाचे धोरण आहे. थोडक्यात Treating the Patient and not the disease हे आयुर्वेदाचे स्वरूप आहे.

रुग्ण परिक्षणाचे अनेक प्रकार आयुर्वेदाच्या मूळ ग्रंथांमध्ये आहेत. ते सारणी स्वरूपात पुढीलप्रमाणे सांगता येतील.

क्र. परीक्षा प्रकार स्वरूप
त्रिविध दर्शन, स्पर्शन, प्रश्न रोग्याचा रंग, आकृती, हालचाल, सूज इ. पहाणे = दर्शन. ताप, थंडपणा, नाडी इ. स्पर्शाने पहाणे = स्पर्शन. रोग्याला प्रश्न विचारून सगळा इतिहास घेणे = प्रश्न.
चतुर्विध
प्रत्यक्ष ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने वैद्याने केलेली परिक्षा
अनुमान माहीत असलेल्या लक्षणांवरून केलेले अंदाज. उदा. व्यायामावरून रोग्याचे शारीरिक बळाचे अनुमान करणे
आप्त आयुर्वेदीय ग्रंथांवरून वैद्यास रोग्यासंबंधी आणि रोगासंबंधी होणारे ज्ञान.
युक्ती अनेक कारणांच्या सहाय्याने वैद्याने करवून घेतलेले ज्ञान
षड्विध पंचज्ञानेंद्रियांमार्फत पाच आणि प्रश्न शब्द,स्पर्श, रूप, रस , गंध आणि प्रश्न परीक्षा
अष्टविध नाडी, मुत्र, मल, जिव्हा, शब्द, स्पर्श, दृष्टी आणि आकृती रोग्याचे हे शरीरभाव तपासून होणारे ज्ञान
दशविध प्रकृती, विकृती, सार, संहनन, प्रमाण, सात्म्य, सत्व, आहारशक्ती, वय आणि व्यायाम या शरीरभावांवरून होणारे रोग्याविषयक ज्ञान.

अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे रूग्णपरीक्षा करून वैद्य रुग्णाची चिकित्सा करीत असतो.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.