चिकित्सा म्हणजे उपचार. रोग बरे करण्याचे उपाय. परंतू आयुर्वेदानुसार चिकित्सेची व्याख्या एवढी त्रोटक नाही.

आयुर्वेदातील चिकित्सेची व्याख्या अशी :

"याभिः क्रियाभिर्जायन्ते शरीरे धातवः समाः ।

सा चिकित्सा विकाराणां….. ॥"

ज्या क्रियांमुळे शरीरातील विषम असलेले दोष (वात, पित्त, कफ), सात धातू, मल सम अवस्थेत येतात, त्याला ‘चिकित्सा’ म्हणतात.

या चिकित्सेचे प्रकार आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत.

 • विकार अनुत्पत्तीकर चिकित्सा आणि विकार प्रशमनी चिकित्सा
 • शोधन चिकित्सा आणि शमन चिकित्सा

 • १)
  • अ) विकार अनुत्पत्तीकर चिकित्सा – रोग निर्माण होऊ नये म्हणुन प्रत्येकाने पाळावयाचे नियम, पाळावयाचे आचरण म्हणजे विकार अनुत्पत्तीकर चिकित्सा होय.
  • ब) विकार प्रशमनी चिकित्सा – रोग उत्पन्न झाल्यावर त्यावर केलेली चिकित्सा ती विकार प्रशमनी चिकित्सा होय.
 • २)
  • अ) शोधन चिकित्सा – काही विशिष्ट क्रियांद्वारे शरीरात कुपित झालेले दोष शरीराबाहेर काढुन टाकणे म्हणजे शोधन होय. यात पंचकर्मांच अंतर्भाव होतो.
  • ब) शमन चिकित्सा – कुपित झालेले दोष शरीराबाहेर न काढता या विषम झालेल्या दोषांमध्ये साम्य निर्माण करून शरीर निरोगी करणे म्हणजे शमन चिकित्सा होय.

आयुर्वेदिक चिकित्सा करीत असतांना एक वैशिष्ट्य लक्षात येईल की, एका रोगाची चिकित्सा करीत असतांना दुसरा रोग त्या उपचारांनी निर्माण होणार नाही याचा विचार आधिक्याने केला जातो. आणि म्हणुनच आयुर्वेदिक चिकित्सेला / उपचाराला “ शुद्ध चिकित्सा “ असे म्हटले जाते.

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.